सोशल मीडियात व्हायरल होत आहे लाल सिंग चड्ढामधील आमिरचा नवा लूक


सध्या आपला आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान व्यस्त आहे. आमिर खान याने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. यामध्ये दाढी-मिशा आणि पंजाबी पगडी अशा वेषातील आमिर खानला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर आमिर खानचे चित्रीकरणादरम्यानचे आणखी काही फोटो आता समोर आले आहेत. सध्या हिमाचल प्रदेशात आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’चे शुटिंग करत आहे.


आमिर खान यावेळी स्थानिक लोकांना भेटला. आमिरसोबत या लोकांनी फोटोसेशन केले. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमिर खानने या फोटोंमध्ये डोक्यावर एक टोपी घातल्याचे दिसत असून त्याची लांब दाढीही तशीच आहे. पण आमिरने यापूर्वी ट्विट केलेल्या पंजाबी व्यक्तीपेक्षा हा लूक पूर्णपणे वेगळा आहे.


हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. टॉम हॅक्स आणि रॉबिन राईट यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १९९४ साली रिलीज झाला होता. ‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. तर अतुल कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

Leave a Comment