भारतातील रेल्वेस्टेशन होणार अतिसुरक्षित


देशातील सर्व रेल्वेस्टेशन अतिसुरक्षित करण्यासाठी रेल्वे विभागाने काम सुरु केले असून पहिल्या टप्प्यात देशातील ९८३ स्थानके निवडली गेली आहेत. यासाठी केंद्र सरकारने निर्भया फंड मधून २५० कोटींचा पहिला हप्ता जारी केला आहे. रेलटेल तर्फे हे काम केले जात आहे. त्यात स्टेशन सुरक्षा वाढविण्यासाठी व्हिडीओ सर्विलांस सिस्टीम बसविल्या जात आहेत तसेच फेस रेकग्निशन सिस्टीम सुद्धा इन्स्टॉल केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या स्टेशनवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे आयपी बेस्ड व्हिडीओ सर्व्हेलन्स सिस्टीम तैनात होत आहेत. त्याला फॅशन टेक्नोलॉजीची मदत घेतली जात आहे. यामुळे पोलिसना तातडीने हवे असलेले गुन्हेगार, दहशतवादी रेल्वे परिसरात आले असतील तर या सिक्युरिटी फिचरच्या सहाय्याने त्यांची त्वरित ओळख पटविली जाईल आणि तशी सूचना कंट्रोल रूम कडे मिळेल. असे संशयित ही व्हिडीओ सिस्टीम टिपेल आणि अलार्म वाजेल. ही सुरक्षा प्रणाली केवळ रेल्वे स्टेशनवरच नाही तर आसपासचा परिसर, पार्किंग, स्वच्छतागृहे, फुटओव्हर ब्रीज, वेटिंग रूम, रिझर्वेशन काउंटर अशी सर्व ठिकाणे कव्हर करणार आहे.

यासाठी उच्च प्रतीच्या एचडी, अल्ट्राएचडी कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. सध्या २०५ स्टेशनवर हे काम सुरु झाले असून त्यात साउथ आणि वेस्टर्न रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. बल्लारी, बंगलोर, बेळगाव, वास्को द गमा, बांगरपेट, हसन या दक्षिण रेल्वे स्थानकांवर तसेच पश्चिम रेल्वेच्या भावनगर, उधना, बलसाड, नागदा, नवसारी, वापी, राजकोट स्टेशनवर हे काम केले जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतेक सर्व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे अधिक सुरक्षा गरजेची ठरली आहे. त्यामुळे व्हिडीओ सर्वेलांस सिस्टीमचा वापर केला जात आहे.

Leave a Comment