प्रिन्स हॅरी आणि मेगन सोडणार राज वारसा


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा नातू आणि ड्युक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेघन मर्केल शाही परिवाराच्या वरिष्ठ सदस्य पदाचा त्याग करणार असल्याचे समजते. हे दोघेही त्यांचे आर्थिक स्वातंत्र मिळविण्यासाठी काम करणार असून प्रिन्स हॅरी आणि डचेस मेघन यांनी या संदर्भात सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे.

त्यानुसार प्रिन्स हॅरी आणि मेघन महाराणी, कॉमनवेल्थ साठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतानाचा युनायटेड किंग्डम व उत्तर अमेरिकेत त्यांच्या वेळ व्यतीत करण्याची योजना आखत आहेत. मे २०१९ मध्ये या दोघांचा विवाह झाला असून त्यांना एक अपत्य आहे. प्रिन्स हॅरी हा राजगादीचा सहावा वारस आहे. विवाहानंतर त्यांना ससेक्सचे ड्युक आणि डचेस खिताब मिळाला आहे. हे दोघेही सध्या कॅनडा मध्ये सुटीवर आहेत. तेथून परतल्यावर त्यांनी सार्वजनिक जीवनातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रिन्स हॅरीने मोठा भाऊ प्रिन्स विलियम्स याच्यासोबत थोडे मतभेद असल्याची कबुली यापूर्वीच दिली होती. प्रिन्स हॅरी आणि मेघन एका चॅरीटी संस्थेच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक स्वातंत्र मिळविणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Leave a Comment