बाबो ! 15 वर्षात या महिलेने खाल्ली 7.5 लाखांची टॅल्कम पाउडर

लोकांना तंबाखू, सिगरेट, गुटखा अशा एकना अनेक गोष्टींचे व्यसन असते. मात्र तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला टॅल्कम पाउडर खाण्याचे व्यसन असल्याचे ऐकले आहे का ? मात्र लीसा एंडरसन नावाच्या एका महिलेने खुलासा केला आहे की ती दररोज टॅल्कम पाउडर खाते. थोडथोडकी नव्हे, तर ती दिवसाला 200 ग्रॅम टॅल्कम पाउडरचा डब्बा खाते.

लीसाचे वय 44 आहे. तिला पाउडरचे व्यसन 15 वर्षांपुर्वी लागले. एकदा तिच्या बाळाला अंघोळ घालत असताना तिला जॉन्सन अँड जॉन्सन पाउडर खाण्याची इच्छा झाली. तेव्हा पहिल्यांदा तिने या पाउडरचा स्वाद घेतला आणि त्यानंतर तिला याची सवयच लागली.

लीसा 5 मुलांची आई आहे. ती सांगते की, ती प्रत्येक अर्ध्या तासाने हातावर पाउडर घेते आणि खाते. एवढेच नाही तर अनेकदा रात्री जाग आल्यावर देखील ती पाउडर खाते. तिने सांगितले की, मागील 15 वर्षात तिने 8,000 पाउंड म्हणजेच 7.5 लाख रुपयांपेक्षा अधिक टॅल्कम पाउडर खाल्ली आहे.

तिने सांगितले की, 15 वर्षात असे एकदाही झाले नाही की सतत 2 दिवस ती टॅल्कम पाउडर खाल्याशिवाय राहिली आहे. तिने ही गोष्ट सर्वांपासून, आपल्या आधीच्या पतीपासून देखील लपवली होती.

लीसाला आपले हे भयंकर व्यसन सोडायचे आहे. डॉक्टर्सनी सागितले की, ती पिका सिंड्रोमने पिडित आहे. या सिंड्रोममध्ये लोक जी गोष्ट खाण्यायोग्य नाही अशा गोष्टी खातात. अनेक लोक माती, रंग देखील खातात. ही पाउडर खाल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Leave a Comment