जाणून घ्या टाटा स्कायच्या नव्या अँड्राईड’ सेटटॉप बॉक्सबाबत

डीटीएच सेवा देणारी कंपनी टाटा स्कायने आपली नवीन सेवा टाटा स्काय बिंज+ (Tata Sky Binge+) भारतात सुरू केली आहे. टाटा स्काय बिंज+ एक अँड्राईड सेटटॉप बॉक्स आहे. बिंज+ मध्ये अँड्राईड सपोर्ट असल्याने युजर्स या सेटटॉप बॉक्सद्वारे सेटेलाईट चॅनेल आणि ओटीटी अ‍ॅप्स जसे की अ‍ॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्स पाहू शकतील.

किंमत –

टाटा स्काय बिंज+ ला कंपनीची अधिकृत वेबसाईट www.tatasky.com वरून खरेदी करता येईल. याची किंमत 5,999 रुपये आहे. मात्र ही सेवा केवळ नवीन ग्राहकांसाठीच आहे.

टाटा स्काय बिंज+ सोबत काय काय मिळेल ?

यासोबत हॉट स्टार, झी5 आणि सनएनएक्सटी सारखे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. नवीन ग्राहकांना ही सेवा मोफत मिळत असून, याची किंमत 249 रुपये आहे. मात्र ही सेवा एका महिन्यासाठीच आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांना हॉट स्टार, झी5 यांचे फ्री स्बस्क्रिप्शन मिळेल. सोबतच अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप 3 महिन्यांसाठी फ्री मिळेल.

स्पेसिफिकेशन –

यामध्ये अँड्राईड पाय 9.0 चा सपोर्ट मिळेल. यासोबत मिळणाऱ्या रिमोटसोबत गुगल असिस्टेंट सपोर्ट मिळेल. त्यामुळे तुम्ही बोलून टिव्ही कंट्रोल करू शकता. ओटीटी अ‍ॅप्सला पाहण्यासाठी इंटरनेट सपोर्ट देखील मिळेल.

टाटा स्काय बिंज+ सेटटॉप बॉक्समध्ये तुम्हाला 5000 पेक्षा अधिक अ‍ॅप्स आणि गेम डाउनलोड करण्याची संधी मिळेल. हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या बॉक्समध्ये 2जीबी रॅम + 8 जीबी स्टोरेज मिळेल.

Leave a Comment