पुणे पोलीस या ‘महाराजांचे’ फाडणार चलान, ट्विट व्हायरल

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांचे अधिकृत ट्विट हँडल सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. आपल्या भन्नाट ट्विटमुळे पुणे पोलीस चर्चेत आले आहेत. अशाच एका ट्विटला रिप्लाय देताना पुणे पोलिसांनी केलेले ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. हे ट्विट वाचल्यावर तुम्ही देखील हसू रोखू शकणार नाही.

पंकज नावाच्या एका ट्विटर युजरने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये होंडाची एक स्कूटी दिसत असून, नंबर प्लेटवर एक छोटा राजाचा मुकूट दिसत आहे. याच ट्विटर पुणे पोलिसांनी मजेशीर उत्तर दिले आहे. पोलिसांनी लिहिले की, आता या महाराजांना लवकरच चलान फाडून सन्मानित करण्यात येईल.

मोटार वाहन कायद्यानुसार, कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबरशिवाय काहीही नसावे.

पुणे पोलिसांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून, युजर्स मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

Leave a Comment