‘बंद’मध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार मोदी सरकार


मुंबई : देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांनी आज देशव्यापी ‘बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान मोदी सरकारने या बंदला पाठिंबा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने बँकिंग क्षेत्र आणि वाहतुकीवर या बंदमुळे मोठी परिणाम होणार आहे. देशातील 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये 25 कोटी कर्मचारी व नागरिक सहभागी होतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे. जनतेविरोधाततील धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत असल्याचे या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

Department of Personnel and Training ने बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार आहे. यासोबतच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्य़ांना संपात सहभागी न होता कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पण तरी देखील कर्मचारी गैरहजर राहिल्य़ास त्यांचे वेतन कापले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या कर्मचाऱ्याच्या पगारासोबत भत्ताही कापण्यात येणार असल्याची माहिती DoPT ने दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी भारत ‘बंद’चे आवाहन केले आहे.

Leave a Comment