इराण-अमेरिकेच्या तणावाची झळ तुमच्याही खिश्याला बसणार

अमेरिकेने एअर स्ट्राइकमध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. आता इराणने याचा बदला घेण्यास सुरूवात केली आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर एक डझन क्षेपणास्त्र डागली आहे. या दोन्ही देशातील तणावामुळे भारतीयांच्या खिश्यावर देखील परिणाम पाहिला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस, सोने अशा अनेक गोष्टी महागणार आहेत.

तेलाच्या किंमतीत वाढ –

भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करते. यातील बहुतांश तेल आखाती देशातून येते. कुवैत, इराक, संयुक्त अरब अमिरात सारख्या देशाकडून भारत तेल घेतो. हे तेल हर्मज खाडीतून येते. इराण लवकरच होर्मुझ जलमार्ग बंद करू शकतो. तेल व्यापारासाठी हा जलमार्ग महत्त्वाचा आहे. सध्या कच्चे तेल 2.12 डॉलर प्रति बॅरल वाढून 72 डॉलर प्रति बॅरेल पार गेले आहे. संकट वाढल्यास पेट्रोलचे भाव प्रती लिटर 90 रुपये आणि डिझेलचे भाव 85 रुपये लिटर पर्यंत पोहचू शकतात.

रुपया घसरणार –

येणाऱ्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक घसरू शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी घसरून 72.02 वर गेला आहे. दोन्ही देशातील तणाव असाच कायम राहिला तर  डॉलरच्या तुलनेत रुपया 74 पर्यंत जाऊ शकतो.

सोने-चांदी महागणार –

येणाऱ्या काळात सोने 44 हजारांपर्यंत जाऊ शकते. मागील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

विमान भाडे महागणार –

विमान नियामक डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना आखाती देशाचे हवाई मार्गांचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अमेरिका, युरोप, रशियाला जाणारी विमाने दुबईच्या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत. विमानांना दुसरा मार्ग घ्यावा लागेल. जेणेकरून वेळ अधिक लागेल व भाडे वाढेल.

Leave a Comment