भारतीय विमान कंपन्यांना इराण-इराक हवाई मार्ग न वापरण्याचे आदेश

भारतीय आणि इराणमधील तणावाच्या वातावरणानंतर आता भारतीय सरकारने देखील खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या एअर लाइन्सला सांगितले आहे की, इराण-ईराक एअरस्पेसचा वापर करू नये.

नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी यासंबंधी एक बैठक केली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की भारतीय विमानांना आखाती देशातून उड्डाण घेण्यापासून थांबवण्यात यावे. याबाबत केंद्र सरकारने देखील सर्व विमान कंपन्यांना आखाती प्रदेशातून उड्डाण न घेण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिका आणि इराणमधील तणावपुर्ण परिस्थितीत अनेक देशांनी आपल्या एअर लाइन्सला इराण-इराक हवाई मार्ग न वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत. अमेरिका आणि सिंगापूर एअर लाईन्सने देखील हवाई मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment