ईपीएफ खात्याच्या तपशीलात असा करा ऑनलाईन बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नाव, जन्मतारीख आणि ईपीएफ रेकॉर्डमधील अन्य माहितीत सहज बदल करू शकतात. ही सुविधा ऑफलाईनच्या तुलनेत खूपच सोपी आहे.

ऑफलाईन सिस्टममध्ये जर एखाद्या सदस्याला आपल्या मूलभूत माहितीमध्ये बदल करायचा असेल तर ईपीएफ कार्यालयात जावे लागेल. ही खूप मोठी प्रक्रिया आहे. याच्या उलट ऑनलाईन बदल करणे खूप सोपे आहे. कर्मचाऱ्याने ऑनलाईन बदल व्हेरिफिकेशन केल्यानंतर रिक्वेस्ट नियुक्ती करणाऱ्या कंपनीच्या ईपीएफ क्षेत्र कार्यालयाला ऑनलाईन ट्रांसमिशनसाठी ट्रांसफर करण्यात येईल.

ऑनलाईन बदल करण्यासाठी प्रक्रिया –

  1. यूएएन आणि पासवर्डचा वापर करून यूनिफाइड पोर्टलचे सदस्य लॉग इन करू शकतात.
  2. होम स्क्रिनवर ‘मॅनेज मोडिफाई बेसिक डिटेल्स’ पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे आधार कार्ड आधीच जोडलेले असेल, तर माहितीमध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही.
  3. तुमच्या आधारमध्ये दिलेली माहितीच भरा. त्यानंतर सिस्टम तुमच्या आधार डेटाशी माहिती व्हेरिफाईड करेल.
  4. तुमची माहिती भरल्यानंतर ‘अपडेट डिटेल’ वर क्लिक करा. ज्याच्यानंतर तुमच्या बदलांची माहिती मंजूरीसाठी कंपनीला (नियुक्ती करणाऱ्याला) पाठवली जाईल.
  5. त्यानंतर कंपनी लॉगइन करून मेंबर डिटेल बदल रिक्वेस्टवर क्लिक करेल व कर्मचाऱ्याकडून बदल करण्यासाठी केलेली विनंती पाहू शकेल.
  6. त्यानंतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करणारी कंपनी त्यावर कारवाई करेल. बदल मान्य झाल्यानंतर कंपनी बदल केलेली माहिती पाहू शकतात.
  7. डिलिंग असिस्टेंट मेंबर आता डिटेल्स चेंज रिक्वेस्टवर क्लिक करून लॉग इन करू शकतात आणि ऑनलाईन रिक्वेस्ट बदल पाहू शकतील.
  8. सत्यता तपासल्यानंतर ईपीएफओ अधिकारी विभाग पर्यवेक्षकाला आपल्या शिफारसी देईल.
  9. शेवटच्या प्रक्रियेमध्ये APFC/RPFC बदल स्विकार करेल अथवा अस्विकार करेल.

Leave a Comment