या व्यक्तीने चक्क शेणाने सारवलेल्या गाडीत केली मुलीची पाठवणी

तुम्ही लग्नानंतर नवीन नवरीची पाठवणी फुलांनी सजलेल्या कारमध्ये केल्याचे अनेकदा पाहिले असेल. मात्र कधी शेणाने सारवलेल्या गाडीत नवरीला पाहिले आहे का ? तुमचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. मात्र मराठवाड्यातील एका डॉक्टरने शेणाने सारवलेल्या गाडीत बसवून आपल्या लाडक्या मुलीची पाठवणी केली आहे.

डॉ. नवनाथ दुधाल हे डॉक्टर आणि वैज्ञानिक आहेत, त्यांनी असे केले आहे. त्यांनी मुंबईच्या टाटा रिसर्च हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष काम केले आहे. मे 2019 मध्ये पडलेल्या कडक उन्हाळ्यावेळी त्यांना गारव्यासाठी वारंवार गाडीतील एसी सुरू करावा लागत असे.

Image Credited – Amarujala

हॉस्पिटलमधून निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर दुधाळ यांनी समाजसेवक राजीव दिक्षित यांच्यापासून प्रेरणा घेत उस्मानाबादमध्ये गुरूकुल गोशाळा सुरू केली व गाईच्या शेणावर संशोधन सुरू केले. यावेळी त्यांना समजले की, गाईच्या शेणामुळे बाहेरील तापमान कमी करता येते. यामुळे त्यांनी आपल्या एसयूव्ही गाडीवर शेणाचा थर चढवला.

Image Credited – Amarujala

त्यांनी याविषयी सांगितले की, गाडीला सारवण्यासाठी 30 किलो शेण लागले. त्यांनी दावा केला आहे की, शेण लावल्यानतंर गरमीच्या दिवसात गाडीचे तापमान कमी करण्यासाठी त्यांना जास्त एसीचा वापर करावा लागला नाही. शेणामुळे गाडी लवकर थंड होते व हिवाळ्यात थंडी देखील कमी लागते.

Image Credited – Amarujala

दुधाळ यांनी सांगितले की, शेणाने गाडी सारवल्यानंतर 6 महिने गाडी धुवावी लागत नाही. ज्यामुळे दिवसाला 20 लीटर पाण्याची बचत होते.

त्यांनी आपल्या मोबाईल कव्हरला देखील शेणाचा लेप लावला आहे. त्यांच्या गाडीत शेणाने बनलेले गणपती देखील आहेत. त्यांचा दावा आहे की, शेणाच्या लेपमुळे मोबाईलच्या रेडिएशनपासून बचाव होतो. तसेच गाडीत सकारात्मक उर्जा कायम राहते.

Leave a Comment