या 94 वर्षीय महिलेला ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इअर’ का म्हणाले आनंद महिंद्रा ?

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा नेहमी आपल्या ट्विट हँडलवर लोकांना प्रेरित करतील अशी कहानी शेअर करत असतात. आता महिंद्रा यांनी एका 94 वर्षीय महिलेची स्टोरी शेअर करत त्यांना ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इअर’ म्हटले आहे. यात त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे 94 वर्षीय महिला मिठाई बनवून पैसे कमवत आहे.

या महिलेचा व्हिडीओ डॉक्टर मधु टेकचंदानी यांनी आनंद महिंद्रा यांना टॅग करत शेअर केला आहे. हा व्हिडीओ चंदीगढच्या हरभजन कौर यांचा आहे. ज्या आपल्या घरूनच बेसनच्या बर्फी बनविण्याचे काम करतात. याची सुरूवात त्यांनी 4 वर्षांपुर्वी केली होती.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, जेव्हा तुम्ही स्टार्ट अप हा शब्द ऐकता त्यावेळी सर्वात प्रथम सिलिकॉन व्हॅली अथवा बंगळुरूच्या लोकांची आठवण येते. जे आपले काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता यात 94 वर्षीय महिलेचा देखील समावेश करा. ज्या हा विचार करत नाहीत की काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी खूप उशीर झाला आहे. माझ्यासाठी त्या एंटरप्रेन्योर ऑफ द इअर आहेत.

नेटकऱ्यांना देखील हा व्हिडीओ आवडत असून, आतापर्यंत 85 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे, हजारो युजर्सनी लाईक केला आहे.

Leave a Comment