अभिनेते प्रविण तरडे ‘त्या’ कमेंटमुळे झाले ट्रोल


भाजप समर्थनार्थचे कमेंट करणे ‘मुळशी पॅटर्न’फेम अभिनेते प्रविण तरडे यांना चांगेलच महागात पडले असून संपूर्ण देश भाजपसोबत असल्याची फेसबुक कमेंट केल्याने प्रविण तरडेला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे.

जेएनयूतील हल्ल्याचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत असताना यात प्रविण तरडे यांनीही उडी घेतली. पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहीली होती. एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपसोबत आहात. ठरवा, असे फेसबुकवर त्यांनी पोस्ट केले. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी परुळेकरांच्या या पोस्टवर संपूर्ण देश भाजपसोबत, अशी कमेंट केली. नेटिझन्सकडून या कमेंटवर टीकांचा भडीमार सुरू झाला आहे. आतापर्यंत जवळपास २ हजाराहून अधिक प्रतिक्रिया तरडेंच्या कमेंटवर आल्या आहेत. यात तरडेंचा समाचार घेणाऱ्या सर्वाधिक प्रतिक्रिया आहेत.

देशभर ठिकठिकाणी जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवत आंदोलने सुरू आहेत. तर सिनेसृष्टीत यावरुन दोन गट पडले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण , दिग्दर्शक लेखक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, स्वरा भास्कर हे कलाकार जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मैदानात उतरले आहेत. त्यात प्रविण तरडेने भाजपच्या बाजूने कमेंट केल्याने नेटिझन्स चांगलेच संतापलले पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment