या आहेत जगातील 10 सर्वात भीषण विमान दुर्घटना

आज सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमान बोईंग ७३७  दुर्घटनाग्रस्त झाले. यात सर्व 170 प्रवाशांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

विमान दुर्घटनांचा इतिहास देखील मोठा आहे. अनेक विमान दुर्घटनेत सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत, तर काही घटनांमध्ये एकही प्रवासी वाचला नाही. अशाच 10 सर्वात मोठ्या विमान दुर्घटनांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

अमेरिका –

25 मे 1979 मध्ये अमेरिकेच्या एलेनॉय येथे विमान दुर्घटना घडली होती. अमेरिकन एअरलाइन्सची प्लाइट 191 शिकागो विमानात 258 प्रवासी आणि 13 क्रू मेबर्स होते. त्या सर्वांसह जमिनीवरील 2 जणांचा यात मृत्यू झाला होता.

Image Credited – Zee Business

इराण –

19 फेब्रुवारी 2003 ला इराणच्या केमरान येथील पर्वतीय भागात विमान दुर्घटनेत 275 जणांना प्राण गमवावे लागले होते. यात रिवॉल्युशनरी गार्डचे जवान होते.

Image Credited – Amarujala

होर्मुझची सामुद्रधुनी –

होर्मुझची सामुद्रधुनीत 3 जुलै 1988 ला इराण एअरचे विमान पाडण्यात आले होते. यातील सर्वच्या सर्व 290 लोक मारले गेले होते. हे लढाऊ विमान असल्याचे समजून अमेरिकेच्या नौदलाने हे विमान पाडले होते.

Image Credited – Amarujala

युक्रेन –

17 जुलै 2014 युक्रेनच्या दोनोत्सक भागात मलेशिया एअरलाईन्सचे विमान रशिया समर्थक गटाने क्षेपणास्त्र हल्ला करून पाडले होते. यात 283 लोक मारले गेले होते.

Image Credited – Amarujala

सौदी अरेबिया –

19 ऑगस्ट 1980 ला सौदी अरेबियाची राजधानी रियादमधून सौदीया एअरलाईन्सचे विमान 163 ने उड्डाण घेतले. काही वेळातच या विमानाला आग लागली. यात 287 प्रवाशांसोबत एकूण 301 लोकांचा मृत्यू झाला.

Image Credited – Amarujala

आयर्लंड –

23 जून 1985 एअर इंडियाचे विमान आयर्लंडवरून जात असताना बॉम्बने उडवण्यात आले होते. यात 329 लोकांना प्राण गमवावे लागले. यामागे बब्बर खालसा या संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

पॅरिस –

3 मार्च 1974 ला पॅरिसजवळील जंगलात टर्किश एअरलाइन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये 346 जणांचा मृत्यू झाला होता.

Image Credited – Amarujala

भारत –

12 नोव्हेंबर 1996 ला हरियाणाच्या चरखी दादरी येथे आकाशात सौदी अरेबिया आणि कझाकिस्तानच्या विमाने एकमेंकाना धडकली होती. यात 349 लोक मरण पावले होते.

Image Credited – Amarujala

जापान –

12 ऑगस्ट 1985 ला जापानची राजधानी टोकियोपासून जवळपास 100 किमी लांब जापान एअर लाइन्सच्या विमानाचा अपघात झाला होता. यात 520 लोकांचा मृत्यू झाला होता.

Image Credited – Amarujala

स्पेन –

27 मार्च 1977 ला जगाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. यात 583 लोकांना जीव गमवावा लागला होता. स्पेनच्या टेनेरीफ बेटावरीव विमानतळावर दोन विमाने रनवे वरच एकमेंकाना धडकली होती.

Leave a Comment