प्यूतो कार्टोचा नैसर्गिक झरोखा भूकंपात नष्ट


फोटो सौजन्य,द.टेलेग्राफ
कॅरेबियन द्वीप प्युतो रिको येथे मंगळवारी स्थानिक वेळ ४.१९ मिनिटांनी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने येथील नैसर्गिक आश्चर्य मानली जाणारी नैसर्गिक खिडकी कोसळली आहे. या भूकंपांची तीव्रता ५.८ रिश्टर होती आणि त्यामुळे अनेक घरे दुभंगली आणि लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान गुआनिला तटाला झाले असून तेथेच ही नैसर्गिक विंडो होती. हा बीच पर्यटकांचे अतिशय आवडते स्थळ आहे. ही नैसर्गिक विंडो येथे प्लाया वेन्ताना नावाने ओळखली जात असे.

सोशल मीडियावर या नैसर्गिक झरोख्याचे फोटो शेअर केले गेले असून त्यात पूर्वीचा झरोखा आणि आता भूकंपामुळे कोसळलेला भाग दिसत आहे. अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्र द्विपाच्या दक्षिणेला १० किमीवर होते. मात्र पॅसीफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने येथे त्सुनामीचा धोका नसल्याचे जाहीर केले आहे. २८ डिसेंबर पासून येथे भूकंपाचे धक्के बसत आहेत. आजचा धक्का त्यातील सर्वात मोठा होता.

प्यूतो कार्टो हे पर्यटन स्थळ म्हणून वेगाने विकसित झाले असून दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. २०१९ मध्ये या द्विपाला ३७ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे.

Leave a Comment