सेल्फी टाईप तंत्रज्ञानामुळे कीबोर्डची सुट्टी होणार


फोटो सौजन्य सॅमसंग
टेक कंपनी सॅमसंगने टेकशो सीईएस २०२० मध्ये एक अजब तंत्रज्ञान पेश करण्याचा निर्णय घेतला असून या तंत्रज्ञानाला सेल्फी टाईप असे नाव दिले गेले आहे. या तंत्रज्ञानामुळे टायपिंग साठी कीबोर्डची गरज संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी कोणत्याही सरफेस म्हणजे पृष्ठभागावर युजर टायपिंग करू शकणार आहेत. या संदर्भातला एक व्हिडीओ कंपनीने शेअर केला आहे.

एकप्रकारे हा अदृश्य कीबोर्ड आहे. त्यासाठी सॅमसंगच्या गॅलेक्सी फोनच्या सेल्फी कॅमरा प्लस एआयचा वापर केला जाईल. त्याच्या माध्यमातून कॅमेरा युजरच्या बोटांच्या हालचाली ट्रेक करेल आणि समोरचा कोणताही सरफेस कीबोर्ड सारखा वापरता येईल. या वापराची पद्धत अगदी सोपी आहे. त्यासाठी फोन व्हर्टिकल पोझिशनमध्ये ठेवायचा आणि टायपिंग सुरु करायचे. तुम्ही गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन वापरत असलात तर हा फोन एल शेप मध्ये ठेवावा लागेल. सध्या हे तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेला सपोर्ट करणार आहे पण लवकरच ते अन्य भाषा सपोर्ट करेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment