सीइएस मध्ये झळकली मर्सिडीजची अवतार कन्सेप्ट कार


टेक्नोलोजी जगतातील सर्वात बडा इव्हेंट सीईएस (कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये दिग्गज कंपन्या त्याच्याकडून वापरल्या जाणाऱ्या भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक पेश करत असतानाच ऑटो क्षेत्रातील बलाढ्य मर्सिडीज बेंझने त्याची शानदार कन्सेप्ट कार लास वेगास मधील या शो मध्ये सादर केली आहे. त्यात कंपनी कारसाठी कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे त्याची ओळख करून दिली गेली आहे. ही कार व्हिजन अवतार नावाने पेश केली गेली आहे.

जेम्स कॅमेरून याने २००९ साली दिग्दर्शित केलेल्या अवतार या चित्रपटाने चित्रपट जगतात धमाल केली होती. त्याच चित्रपटावरून प्रेरणा घेऊन मर्सिडीजने ही कार बनविली आहे. तिचे डिझाईन करताना जेम्स कॅमेरूनची मदत घेतली गेली आहे. अतिशय शानदार स्टाईल, लेटेस्ट एंटरटेनमेंट फिचर्स आणि अन्य अजब फिचर्स यात दिसतील. या कारच मागचा भाग बायोनिक फ्लॅक्सने तयार केला गेला आहे. त्याचा उपयोग कारच्या बाहेर असलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी होऊ शकणार आहे.


कारची चाके खास प्रकारची आहेत. ती सिड्स ऑफ द ट्री ऑफ सोलॅसवरून प्रेरणा घेऊन बनविली गेली आहेत. या कारला स्टिअरिंग नाही पण स्वयंचलित कंट्रोलर आहे. पॅसेंजर त्याच्या माध्यमातून कारशी बोलू शकेल. कार सुरु झाली की आतील मोठ्या स्क्रीनवर थ्री डी ग्राफिक्स दिसतील. या कारचे इंटिरीअर रिसायकल प्लास्टिक आणि वेगन लेदरपासून तयार केले गेले आहे. या कारसाठी ऑर्गनिक बॅटरी सेल्सचा वापर केला गेला आहे. हे सेल्स नंतर शेतात खत म्हणून वापरता येणार आहेत.

Leave a Comment