जगभरात तुरुंगात महिला गुन्हेगारांच्या संख्येत वेगाने वाढ


कोणताही गुन्हा किंवा अपराध घडला तर त्यासाठी पुरुष अधिक संख्येने जबाबदार असतात असे आजपर्यंत दिसून आले आहे. त्यात गुन्हे हिंसक प्रकारातील असतील तर पुरुष गुन्हेगारांची संख्या नक्कीच अधिक असते. पण जगभर गुन्हे प्रकरणावर नजर ठेवणाऱ्या लंडनच्या इन्स्टिट्यूट फॉर क्रिमिनल पॉलिसी रिसर्च च्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात वेगळेच सत्य समोर आले आहे.

गेल्या तीस वर्षातील निरीक्षणानुसार जगभरात अपराध दर घटला असल्याचे दिसत असले तरी या काळात हिंसक कृत्यात दोषी ठरलेल्या महिला गुन्हेगारांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खासगी तपासनीस कॅली पॅक्सटन हिच्या मते महिला गुन्हेगारांची संख्या वेगाने वाढण्यामागे वाढलेले खर्च, गरजा पूर्ण न होणे आणि आर्थिक तंगी अशी कारणे समोर आली आहेत. गेल्या तीस वर्षात जगभरात तुरुंगात गेलेल्या महिला गुन्हेगारांच्या संख्येत ५० टक्के वाढ झाली असल्याचेही समोर आले आहे.

एकट्या ब्रिटन मध्ये २०१५-१६ मध्ये ही वाढ ५० टक्के आहे. जगात ७.१४ लाख महिला कैदी तुरुंगात आहेत. त्यात अमेरिकेत २.११ लाख, चीन मध्ये १.०७ लाख, रशिया ४८४७८, ब्राझील ४४७००, थायलंड ४१११९, आणि भारत १७८३४ महिला गुन्हेगारांचा समावेश आहे.

Leave a Comment