गजबच ! या ठिकाणी मिर्चीसोबत मिळतात रसगुल्ले

आपल्या देशात रसुगल्ला आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वसाधारणपणे रसगुल्ला गोड असतो. मात्र एक ठिकाण असे आहे जेथे रसगुल्ले तिखट असतात व लोक आवडीने खातात देखील. पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील दुकानात हे रसगुल्ले मिळतात. लोक हे तिखट रसगुल्ले हिरव्या मिर्ची सोबत खातात.

या रसगुल्ल्यांना पारंपारिक पद्धतीपेक्षा उलटे बनविण्यात आले आहे. गोड पदार्थांची आवड असणारे देखील हा तिखट रसगुल्ला आवडीने खातात. मिदनापूरच्या चर्च स्कूलजवळील मिठाईच्या दुकानात हे रसगुल्ले खाण्यास गर्दी होते. हे तिखट रसगुल्ले तयार करणारे अरिंदम शॉ सांगतात की, मी आधी गुळ, केसर आणि आंब्याचे रसगुल्ले बनवत असे. मात्र मला जाणवले की लोकांना चवीमध्ये बदल हवा आहे.

या हटके रसगुल्ल्याची किंमत केवळ 10 रुपये आहे. अनेक मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, मधुमेहामुळे अनेकजण साखरेच्या पाकातील रसगुल्ले खाण्यापासून वाचतात. त्यामुळे व्यापारावर परिणाम होतो. म्हणून अनेकजण रसगुल्ल्यावर प्रयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ले तयार करत आहेत.

Leave a Comment