उत्तर कोरियाबद्दल या विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?

उत्तर कोरिया तसे तर क्षेपणास्त्र चाचणी आणि अमेरिकेबरोबरील तणावासाठी ओळखले जाते. मात्र या देशात असे अनेक विचित्र कायदे आहेत, ज्याच्यावर जगभरात टीका होते. मात्र या देशाला त्याने काहीही फरक पडत नाही. येथील कायदे देशातील प्रत्येक नागरिकाला मानावेच लागतात.

Image Credited – Amarujala

संपुर्ण जगात जेथे 2020 हे वर्ष चालू आहे, तर उत्तर कोरियात आता 109 हे वर्ष साजरे केले जाते. किम II सुंगला उत्तर कोरियाचे संस्थापक म्हटले जाते. त्यांचा जन्म 1912 ला झाला होता. त्यांच्या जन्मवर्षापासूनच उत्तर कोरिया आपल्या नवीन वर्षाची गणना करते.

Image Credited – Amarujala

उत्तर कोरियामध्ये कायदा आहे की येथे सर्वसामान्य नागरिक कार खरेदी करू शकत नाहीत. केवळ सेना आणि सरकारमधील अधिकारी कार स्वतःजवळ ठेऊ शकतात.

Image Credited – Amarujala

उत्तर कोरियामध्ये किजोंग डांग नावाचे एक शहराचे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. उत्तर कोरियाच्या एकदम सीमेवर या शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. जे दक्षिण कोरियातील लोकांना आकर्षित करण्यासाठी आहे. मात्र येथे कोणीच राहत नाही.

Image Credited – Amarujala

या देशात गरिबांचे फोटो काढणे गुन्हा आहे. त्यांचे म्हणणे आहे की यामुळे देशाची प्रतिमा खराब हाते.

Image Credited – Amarujala

येथे तुम्ही आपल्या आवडीचे केस देखील कापू शकत नाहीत. सरकारने लोकांना केस कापण्याचे काही डिझाईन जारी केले आहेत. येथील लोक तेच डिझाईन निवडून केस कापतात.

Image Credited – Amarujala

उत्तर कोरियामध्ये लोकांना निळी जिन्स घालण्यास बंदी आहे. मात्र पर्यटक या रंगाची जिन्स घालू शकतात. किम II सुंग आणि किम जोंग द्वितीयच्या मेमोरियल हॉलमध्ये जाण्याआधी दुसऱ्या रंगाची पँट घालावी लागते.

Leave a Comment