सॅमसंगने सादर केला पहिला ‘आर्टिफिशियल’ मानव

आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील असिस्टेंट आपल्या हवामानाची माहिती, गाणे ऐकवत असे. मात्र आता सॅमसंने आर्टफिशियल मानव सादर केला आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिलेसमध्ये चालू असलेल्या इलेक्ट्रिक कंझ्यूमर शो 2020 मध्ये सॅमसंगने जगातील पहिला आर्टिफिशियल मानव सादर केला केला आहे. जो सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे चालू व बोलू शकतो.

सॅमसंगने या आर्टिफिशियल मानव निऑन (NEON) नाव दिले आहे. हा आर्टिफिशियल मानव मनुष्याप्रमाणे उत्तर आणि एक्सप्रेशन देतो. निऑन तुमचा मित्र बनू शकतो, तुम्ही त्याच्याशी बोलू शकतात.

https://twitter.com/jjvincent/status/1214482967629901824

निऑन नवीन गोष्टी सहज शिकवू शकतो. याशिवाय आपल्या जुन्या अनुभवाद्वारे नवीन कामे देखील करू शकतो. खास गोष्ट म्हणजे तुम्ही याला बोलण्यासाठी “Hey, Neon” अथवा “Ok, Neon” बोलण्याची गरज नाही. तुम्ही त्याला तुमच्या आवडीचे कोणतेही नाव देऊ शकता.

कंपनीनुसार, निऑन प्रोप्रियेटी टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे. ज्याला कोर आर3 म्हटले जाते. या तंत्राद्वारे निऑन मिली सेंकदात उत्तर देतो. निऑनला स्टार लॅबने तयार केले आहे.

निऑन एआय असिस्टेंट नाही. निऑन सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच आहे, मात्र आभासी जगात आहे.

Leave a Comment