ह्युंडाई आणि उबर मिळून बनवणार ‘हवाई इलेक्ट्रिक टॅक्सी’

कार कंपनी ह्युंडाई आणि टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी उबरने एअर टॅक्सी (हवेत उडणारी कार) बनविण्यासाठी करार केला आहे. कंपनीने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2020 मध्ये या एअरक्राफ्ट कॉन्सेप्टला सादर केले आहे.

Image Credited – Amarujala

या एअर टॅक्सी कॉन्सेप्टला नासाकडून प्रेरित डिझाईनच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. करारा अंतर्गत ह्युंडाई हवेत व्हिकल्स बनवणार आणि चालवणार आहे. उबर या एअर व्हिकल्सला एअर स्पेस सपोर्ट सर्व्हिस, ग्राउंड ट्रांसपोर्टेशनद्वारे संपर्क आणि एरिअल राइड शेअर नेटवर्कच्या मदतीने कस्टमर इंटरफेस उपलब्ध करेल.

Image Credited – Amarujala

ह्युंडाईसोबत मिळून उबर पर्सनल एअर व्हिकल मॉडेल एस-ए1 वर काम करत आहे. एअरक्राफ्ट कॉन्सेप्टला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की, 1000-2000 फूट उंचीवर ताशी 290 किमी वेगाने सतत 100 किमी उड्डाण घेऊ शकते. हे एअर व्हिकल 100 टक्के इलेक्ट्रिक असेल. हे एअरक्राफ्ट केवळ 5 ते 7 मिनिटात चार्ज होतील.

Image Credited – Geo

हे एअरक्राफ्ट उडवण्यासाठी पायलट असतील, मात्र काही दिवसानंतर एअरक्राफ्ट विना पायलटचे उड्डाण घेतील. याच्या कॅबिनमध्ये 4 लोकांच्या बसण्याची क्षमता असेल. यात मधील सीट नसेल. ज्यामुळे प्रवाशांना बॅग ठेवण्यासोबतच चढण्यास-उतरण्यास सोपे जाईल.

नासाने ही आधुनिक डिझाईन सर्वांसाठी उपलब्ध केले आहे. या डिझाईनवर अनेक कंपन्या काम करत आहेत.

Leave a Comment