मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध


मुंबई : मनसे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर नव्या वर्षात नव्या जोमाने कामाला लागली आहे. एकाप्रकारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचे मेकओव्हर करण्याच्या तयारीत आहे. यासाठीच मनसेची ओळख असलेला झेंडाही बदलण्यात येणार आहे. पण, हा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मनसेच्या या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.

आता नवीन भगवा झेंडा निर्माण करून मनसेने त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नाही. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. कुठल्याही पक्षांनी त्या राजमुद्रेचा वापर राजकारण करण्यासाठी करू नये, असे म्हणत संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.

तसेच संभाजी ब्रिगेडने राज्याचे निवडणूक आयोग, छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात आणि तक्रार करणार असल्याचेही स्पष्ट केले. भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारे आम्ही आहोत. पण, ‘राजमुद्रा’ वापरणे हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता, समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतिक आहे. त्यांनी तेच स्वीकारावे, हिंदुत्वाची झालर त्यांनी पांघरू नये. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले? आता या जातीच्या रंगाचा मनसे करणार काय? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी विचारला आहे.

Leave a Comment