22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फासावर लटकणार निर्भयाचे दोषी


नवी दिल्ली – अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी चारही आरोपींचे न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले आहे. फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाने मंगळवारी हा महत्वाचा निकाल जारी केला. 22 जानेवारीला सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असे दिल्ली पतियाळा हाउस न्यायालयाने म्हटले आहे. १४ दिवसांचा अवधी या चारही आरोपींना देण्यात आला आहे.

निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांना माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह आणि पवन गुप्ता यांच्या डेथ वॉरंटवर सुनावणी झाली. आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये या वेळी शाब्दिक चकमक झाल्याचेही वृत्त आहे. निर्भयाच्या वकिलांनी दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. तर क्युरेटिव्ह पिटीशन आमच्या पक्षकारांना दाखल करायची असल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान न्यायालयाने काही वेळापूर्वीच या चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केले. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता या आरोपींना फाशी देण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment