कचऱ्यात फेकलेल्या लॉटरीच्या तिकिटानेच या व्यक्तीला बनवले कोट्याधीश

असे म्हणतात की नशीब कधीही बदलू शकते, केवळ व्यक्तीने हार मानू नये. काहीसे असेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पाहायला मिळाले. एक भाजीविक्रेत्याने लॉटरीची तिकिटे कचऱ्यात फेकून दिली होती, मात्र नंतर त्याच तिकिटांनी तो कोट्याधीश झाला.

कोलकाताच्या दमदम भागातील सादिक नावाच्या व्यक्तीला लॉटरी लागली आहे. तो भाजीविक्रेता आहे. त्याने 31 डिसेंबर 2019 ला आपल्या पत्नीसोबत नागालँड लॉटरीची 5 तिकिटे खरेदी केली होती. 2 जानेवारीला जेव्हा लॉटरीची घोषणा झाली त्यावेळी दुकानदाराने त्याला लॉटरी लागली नसल्याचे सांगितले. यामुळे रागात त्याने तिकिटे कचऱ्यात फेकून दिली.

3 जानेवारीला जेव्हा सादिक काही सामान घेण्यासाठी त्याच दुकानात गेला, त्यावेळी दुकानदाराने सांगितले की त्याला एक कोटींची लॉटरी लागली आहे. हे ऐकल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने आपल्या पत्नीला देखील याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी मिळून कचऱ्यात लॉटरीची तिकिटे शोधली व अखेर ते पाचवे तिकिट सापडले.

सादिकने जी 5 तिकिटे खरेदी केली होती, त्यातील एकावर त्याला 1 कोटींचे बक्षीस मिळाले. तर बाकी 4 तिकिटांवर त्याने 1-1 लाख रुपये जिंकले. सादिकची पत्नी अमिनाने सांगितले की, या पैशांनी त्यांचे आयुष्य बदलू शकते. त्यांनी आपल्या मुलांसाठी एक एसयूव्ही देखील बुक केली.

अमिना यांनी सांगितले की, यामुळे त्यांचे कुटूंब खूश असून, केवळ लॉटरीचे पैसे येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवायचे आहे. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी 2-3 महिने लागू शकतात.

Leave a Comment