एचडीएफसी बँकेचा शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम, एका कॉलवर मिळणार सेवा

एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागातील ग्राहकांशी जोडण्यासाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. यासाठी बँकेने एक टोल फ्री क्रमांक लाँच केला आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन ग्रामीण भागातील शेतकरी बँकिंग संबंधित काम करू शकतील.

एचडीएफसी बँकेचा टोल फ्री क्रमांक (1800 120 9655) इंटरॅक्टिव वॉइस रिस्पॉन्स नंबर आहे. बँकेनुसार या टोल फ्री क्रमांकाद्वारे देशातील शेतकऱ्यांना बँकेशी जोडण्यासाठी मदत होईल. बँकेने सांगितले की, हे पाऊल ”हर गांव हमारा” या उपक्रमाचा हिस्सा आहे. याचा उद्देश भारताच्या ग्रामीण भागात पोहचणे आणि विविध आर्थिक, डिजिटल प्रोजेक्ट्स आणि सोशल सिक्युरिटी योजनांबद्दल जागृकता पसरवणे हा आहे.

बँकेनुसार, ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील लोकांकडे बँकिंग सर्विसेज नाहीत. त्यामुळे टोल फ्री नंबर फायदेशीर ठरेल. ग्राहकांना 1800 120 9655 क्रमांकावर कॉल करून पिनकोड नंबर द्यावा लागेल. त्यानुसार जवळच्या शाखेच्या प्रतिनिधीशी शेतकी बोलू शकतील व आपले काम करू शकतील.

गरज पडल्यास प्रतिनिधी शेतकऱ्यांना फोन देखील करतील. बँकेला आशा आहे की यामुळे बँक आणि शेतकरी दोघांना फायदा होईल.

Leave a Comment