आठवड्याला फक्त 4 दिवस काम, या पंतप्रधानांचा प्रस्ताव

जर तुम्हाला आठवड्याला तीन सुट्ट्या आणि इतर 4 दिवस जर फक्त सहाच तास काम करावे लागले तर ? अशा कामाची संधी कोणीच सोडणार नाही. नोकरी कोणतीही असो प्रत्येकाला अधिकाधिक सुट्ट्या हव्या असतात. मात्र विचार करा सरकारनेच असा नियम केला तर ? हो एका देशाच्या पंतप्रधानांनी असा नियम बनविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

काही दिवसांपुर्वीच फिनलँडच्या पंतप्रधान झालेल्या 34 वर्षीय सना मरिन आपल्या देशातील कामाची वेळ कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

सना मरिन सांगतात की, मला वाटते की लोकांना आपले कुटूंब आणि मित्रांबरोबर अधिक वेळ घालवला पाहिजे. त्यांनी आपली आवड आणि आयुष्यातील विविध गोष्टी समजण्यासाठी आणि जगण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

सध्या फिनलँडमध्ये आठवड्याला 5 दिवस आणि 8 तास काम केले जाते. मात्र सना मरिन आठवड्यातील कामाचे दिवस आणि तास कमी करणे व कर्मचाऱ्यांची क्षमता व त्याचे परिणाम अधिक चांगले करण्याच्या बाजूने आहेत.

सना या जगातील सर्वात तरूण पंतप्रधान असून, 4 राजकीय पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारचे त्या प्रतिनिधित्व करत आहेत. सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व महिलाच करत आहेत. आठवड्याला 4 दिवस काम आणि दिवसाला केवळ सहाच तास काम करण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्री ली एंडर्सन यांनी देखील आनंदाने स्विकारला आहे.

फिनलँडचा शेजारील देश स्वीडनने देखील 2015 मध्ये दररोज 6 तास काम करण्याचा नियम लागू केला होता. याचा परिणाम असा झाला की, कर्मचारी आनंदाने काम करू लागले व उत्पादनात, कार्यक्षमतेत वाढ झाली.

Leave a Comment