यशोगाथा : दिव्यांग मुलगी रिक्षा चालवून करत आहे कॅन्सर पिडित वडिलांचा उपचार

आज मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पालकांना सांभाळण्यासाठी मुलांऐवढीज जबाबदारी आज मुली देखील घेतात. अशीच कहानी अहमदाबादची एक 35 वर्षी मुलगी अंकिताची आहे. स्वतः दिव्यांग असलेली अंकिता मागील 6 महिन्यांपासून आपल्या कॅन्सर ग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी रिक्षा चालवत आहे. तिला लहानपणीच पोलिओमुळे आपला उजवा पाय गमवावा लागला होता. अंकिता अहमदाबादची पहिली दिव्यांग महिला ऑटो रिक्षाचालक आहे.

अंकिता अर्थशास्त्रात पदवीधर असून, ती आपल्या 5 बहिण-भावंडात सर्वात मोठी आहे. ती 2012 ला अहमदाबादमध्ये आली व येथे कॉल सेंटरमध्ये काम करू लागली. मात्र वडिलांच्या उपचारासाठी तिने ही नोकरी सोडली व रिक्षा चालवण्यास सुरूवात केली.

अंकिताने सांगितले की, 12 तास काम केल्यानंतर देखील मला महिन्याला 12 हजार रुपये मिळायचे. जेव्हा मला समजले की वडिलांना कॅन्सर आहे, तेव्हा मला वारंवार अहमदाबादवरून सुरतला जावे लागे. ऑफिसमधून सुट्टी मिळत नसे. पगार देखील जास्त नव्हता, त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार केला.

अंकिताने पुढे सांगितले की, वडिलांच्या उपचारासाठी मदत करू शकत नसल्याने मला खूप वाईट वाटत होते. त्यामुळे मी अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिले. मात्र माझे दिव्यांग असणे प्रत्येक ठिकाणी अडचण ठरले. म्हणून रिक्षा चालवण्यास सुरूवात केली.

तिने सांगितले की, रिक्षा चालवणे तिने मित्र लालजी बारोट कडून शिकले. तो देखील दिव्यांग असून, रिक्षा चालवतो. त्याने केवळ रिक्षा चालवणेच नाही तर स्वतःची कस्टमाइज्ड रिक्षा घेण्यास देखील मदत केली. ज्यात एक हँड ऑपरेडेट ब्रेक आहे.

आज अंकिता दररोज 8 तास रिक्षा चालवून महिन्याला 20 हजार रुपये कमवत आहे. तिला स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू करायचा आहे.

Leave a Comment