सुलेमानीच्या अंत्ययात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू


बगदाद – अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला. केरमानमध्ये मंगळवारी सकाळी कासिन सुलेमानी यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये ३५ जण ठार झाले असून ४८ जण जखमी झाल्याचे वृत्त इराणी वाहिनीने दिले आहे.

कासिम सुलेमानी यांचे पार्थिव सोमवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये आणले होते. १० लाखापेक्षा जास्त लोक त्यावेळी जमले होते. कद्स फोर्सचा कासिम सुलेमानी प्रमुख होता. अमेरिकेने शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ केलेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. कासिम सुलेमानी इराणमध्ये लोकप्रिय होता. त्याच्याबद्दल सर्वसामान्य इराण जनतेमध्ये आदराची भावना होती.

Leave a Comment