सरकारने बदलला ‘एसी’ संबंधित हा नियम

या वर्षी जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात गरमीपासून सुटका व्हावी यासाठी एसी खरेदी कराल तेव्हा तो एसी 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होईल. सर्व कंपन्यांचे सर्व प्रकारचे एसी डिफॉल्टरित्या 24 डिग्रीवर सेट राहतील. उर्जा मंत्रालयाने यासंबंधित नॉटिफिकेशन जारी केले आहे. नवीन वर्षात नवी सेंटिंग्ससह एसीची निर्मिती होईल. हे नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू झाले आहेत.

ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियंसी (बीईई) सोबत मिळून सरकारने रूम एअर कंडिशनर्ससाठी एनर्जी परफॉर्मेंस स्टँडर्ड तयार केले आहेत. बीईईकडून स्टार रेटिंग मिळवणाऱ्या सर्व एसींसाठी 24 डिग्री डिफॉल्ट सेटिंग्स अनिवार्य करण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, एसी सुरू केल्यावर त्याची डिफॉल्ट सेटिंग 24 डिग्री असेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यात बदल करू शकाल. वीज बचतीसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बीईईने एसीसाठी 2006 मध्ये स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केला होता. ज्याची 12 जानेवारी 2009 पासून अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर 2015 मध्ये इनवर्टर रूम एअर कंडिशनर्ससाठी वॉल्युन्टरी स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केला होता. जो 1 जानेवारी 2018 पासून लागू करण्यात आला होता. एसीच्या स्टार लेबलिंग प्रोग्रामने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 4.6 अब्ज यूनिटची उर्जा बचत केली आहे.

इंटरनॅशनल एनर्जी एंजेसीनुसार, वर्ष 2050 पर्यंत जगात सर्वाधिक एसीची मागणी भारतात होईल. एसीची खरेदीमध्ये 4206% वाढ होईल.

 

Leave a Comment