दिल्ली निवडणुकीत प्रथमच वोटिंग स्लीप साठी क्यूआर कोडचा वापर


दिल्लीच्या विधानसभा निवडणुका येत्या ८ फेब्रुवारीला होत असल्याही घोषणा निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली असून या निवडणुकीत देशात सर्वप्रथम व्होटिंग स्लीपसाठी मतदार क्यूआर कोडचा वापर करू शकणार आहेत. यामुळे मतदाराची ओळख पटविणे आणि मतदारांना योग्य सुविधा पुरविणे अधिक जलद गतीने होणार आहे. क्यूआर कोड वापरणारे दिल्ली देशातील पहिले राज्य, केंद्रशासित प्रदेश बनणार आहे.

यासाठी प्रथमच प्रत्येक मतदार केंद्रात एक बुथ या अॅपचा उपयोग करण्यासाठी असेल. क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. हा कोड टू डायमेन्शन बार कोड असून याचा वापर १९९० च्या दशकात सर्वप्रथम केला गेला होता. पूर्वी या कोड साठी वेगळी मशीन वापरली जात असत पण आता मोबाईल फोन सुद्धा हा कोड वापरण्यास सक्षम आहेत. यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग निवडणूक काळात मतदारांसाठी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

यामुळे मतदार मतदान केंद्रापर्यंत मोबाईल नेऊ शकतील. तेथे हा कोड स्कॅन करता येणार आहे. मतदार हेल्पलाईनवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येईल. हा कोड स्कॅन करता येणार आहे. त्यानंतर मतदाराला त्याचा मोबाईल उपलब्ध लॉकर मध्ये ठेऊन मतदान करता येणार आहे.

Leave a Comment