यंदाच्या वर्षात विकले जाणार २० कोटी ५ जी फोन


अमेरिकेच्या गुंतवणूक बँकिंग आणि वित्तीय सेवा देणाऱ्या गोल्डमन सॅक्सच्या अनुमानानुसार यंदाच्या वर्षात जगभरात २० कोटी ५ जी स्मार्टफोन विकले जातील. यंदाचा अंदाज २०१९ मधील विक्री पेक्षा २० पट अधिक आहे. मिळालेल्या अन्य माहितीनुसार यंदा चीन मध्ये नवी १० लाख ५ जी बेस स्टेशन्स असतील. गोल्डमनच्या अंदाजानुसार ती ६ लाख असतील.

चीनच्या बलाढ्य शाओमी कंपनीचे सहसंस्थापक लेई जून यांनी कंपनी पुढच्या पाच वर्षात ५ जी, एआय आणि आयओटी मध्ये ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत असल्याची घोषणा केली आहे. शाओमीने त्यांची कडवी प्रतिस्पर्धी हुवावे कडून स्थानिक बाजारात अटीतटीची स्पर्धा करून तिसऱ्या तिमाहीत बाजारात ४२ टक्के हिस्सा मिळविला आहे. शाओमी २०२० मध्ये ५ जी स्मार्टफोनचे उत्पादन वाढविणार असल्याचेही जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment