पहिल्या अणुबॉम्बच्या प्लगचा ७२ लाखांना लिलाव


जगातील पहिला अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमावर टाकला गेला आणि संपूर्ण शहर बेचिराख केले गेल्याचा इतिहास आजही कोणी विसरलेले नाही. या पहिल्या अणुबॉम्बचा म्हणजे लिटील बॉयचा वर्षाव करण्यापूर्वी त्याचे दोन प्लग काढले गेले होते. त्या दोन प्लगचा लिलाव न्युयॉर्क मध्ये बॉनहॅम्स तर्फे नुकताच करण्यात आला. या दोन प्लगला लिलावात ७२ लाख रुपये किंमत मिळाली. लिलाव कंपनीच्या प्रवक्त्याने या दोन प्लगसाठी ७६ हजार पौंडांची बोली लागल्याचे सांगितले.

लिटील बॉयचे हे दोन प्लग हिरवा आणि लाल रंगाचे आहेत. त्याची लांबी ३ इंच असून ते दिसायला लायटर सारखे आहेत. ९ ऑगस्ट १९४५ रोजी जगातला पहिला अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकला गेला. त्याचे वजन ४.४ टन होते. या बॉम्बने अल्पावधीत पूर्ण शहर बेचिराख केलेच पण त्यानंतरही कित्येक वर्षे त्याच्या रेडीएशनचे परिणाम भोगावे लागले. या हल्ल्यात १.४० लाख लोक जीवाला मुकले, कित्येक अपंग बनले. या हल्ल्यानंतर जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली.

हे दोन प्लग मेटल आणि लाकूड यापासून तयार केले गेलेले असून ते लेफ्ट. मॉरिस जेपरून यांच्याकडे आठवण म्हणून ठेवले गेले होते. ते त्याने त्याचा मित्र एडवर्ड याला बक्षीस म्हणून दिले होते. एडवर्डने या प्लगचा लिलाव केला.

Leave a Comment