ट्रम्प यांची हत्त्या करणाऱ्यास ८ कोटी डॉलर्स देणार इराण


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करणाऱ्यास ८ कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याचे वृत्त मिरर डॉट को डॉट युकेने दिले आहे. ट्रम्प यांच्या आज्ञेवरून इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्यात ठार करण्यात आल्याचा उद्रेक इराण मध्ये झाला आहे. सुलेमानी यांच्या रविवारी निघालेल्या अंत्ययात्रेत प्रत्येक इराणी नागरिकाने १ डॉलर दान करावा असे आवाहन करण्यात आले असून इराणची लोकसंख्या ८ कोटी आहे. त्यांच्याकडून जमा होणारी ही ८ कोटी डॉलर्सची रक्कम ट्रम्प यांना ठार करणाऱ्यास दिली जाणार आहे.

इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशन गार्ड्स कॉर्पसचे कमांडर सुलेमानी यांना ३ जानेवारीला बगदाद इंटरनॅशनल एअरपोर्ट रोडवर अमेरिकेने ड्रोन हल्ला करून ठार केले होते. या हत्येची इराणने तीव्र शब्दात निंदा करून या हत्येचा बदला घेतला जाईल अशी घोषणा केली आहे. इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनेई आणि राष्ट्रपती हसन रुहानी यांनी ही घोषणा केली आहे.

Leave a Comment