नववर्षाच्या स्वागतासाठी सुहानाने घातलेल्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क


तसे पाहायला गेले तर सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखची मुलगी सुहाना खान फारशी सक्रिय नसते. याचा प्रत्यय आपण अनेकवेळा घेतला आहे. पण सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्या शिवाय रहात नाहीत. संपूर्ण कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेहून नुकतीच सुहाना भारतात परतली आहे. यादरम्यान एका पार्टीचे शाहरुखने आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सुहानाने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

View this post on Instagram

2020..❤️

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on


सुहानाने काळ्या रंगाचा ड्रेस शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये परिधान केला होता. ती या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. ती सध्या तिने परिधान केलेल्या या ड्रेसमुळे चर्चेत आहे. तुम्ही देखील या ड्रेसची किंमत ऐकून थक्क व्हाल. तिने घातलेल्या Balmain ड्रेसची किंमत तब्बल दोन लाख रुपये आहे.

View this post on Instagram

2020… ❤️

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on


बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते. फोटोमध्ये सुहानाची खास मैत्रीण अनन्या पांडे आणि संजय कपूर तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा पार्टीमधील फोटो गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे.

Leave a Comment