या महिन्यात सादर होणार जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पो 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये चीनची कार कंपनी ग्रेट वॉल मोटर्स पहिल्यांदाच आपल्या गाड्या भारतात सादर करेल. ऑटो एक्स्पोमध्ये ‘ग्रेट वॉल मोटर्स’ काही एसयूव्ही आणि एक इलेक्ट्रिक कार ‘ओरा आर1’ सादर करणार आहे. ओरा आर1 ला जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हटले जाते.

Image Credited – Amarujala

ओरा आर1 इलेक्ट्रिक कार 35 किलोवॉटच्या मोटरद्वारे 351 किमी रेंज देते. या कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टमसोबत कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आलेले आहेत. हे फीचर हॅलो ओरा म्हणून सुरू करता येते. या इलेक्ट्रिक कारचा टॉप स्पीड ताशी 100 किमी एवढा असेल.

Image Credited – Amarujala

कंपनी ओरा आर1 कारसोबत 3 वर्ष किंवा 1.20 लाख किमी अथवा 8 वर्ष 1.50 लाख किमीची गॅरेंटी देऊ शकते. या इलेक्ट्रिक कारची लांबी 3495 एमएम, रुंदी 1660 एमएम आणि उंची 1560 एमएम असेल.

Image Credited – Amarujala

ओरा आर1 इलेक्ट्रिक कारची किंमत 8,680 डॉलर ते 11293 डॉलरपर्यंत (जवळपास 6.23 लाख ते 8.10 लाख रुपये) असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment