कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ?

निवडणूक आयोगाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून, 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. 6 जानेवारीपासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीची रुपरेखा तयार करणारे आणि याची घोषणा करणारे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याविषयी जाणून घेऊया.

सुनील अरोरा हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 ला त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. राजस्थानमध्ये प्रशासनिक सेवेदरम्यान विविध जिल्ह्यातील नेमणुकीबरोबरच ते केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्यात सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजक मंत्रालयात सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे.

अर्थ आणि वस्त्र मंत्रालय आणि योजना आयोगात विविध पदांवर त्यांनी कार्य केलेले आहे. 1993 ते 1998 पर्यंत ते राजस्थानच्या मुख्यंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होते.

सुनील अरोरा यांचा जन्म 13 एप्रिल 1956 ला पंजाबच्या होशियारपुर येथे झाला आहे. सुरूवातीचे शिक्षण होशियारपूरमधील विद्या मंदिर स्कूल आणि दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर डीएव्ही कॉलेश होशियारपूरमधून पदवी घेतली. पंजाब यूनिवर्सिटीमधून त्यांनी एमए केल्यानंतर तेथेच इंग्रजी शिकवू लागले. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. तर आई डीएव्ही कॉलेजमध्ये शिकवत असे.

सुनील अरोरा यांच्याकडे प्रशासनिक कामाचा मोठा अनुभव आहे. आयएएस नोकरी करताना ते राजस्थानच्या धौलपूर, अलवर, नागौर आणि जोधपूर सारख्या जिल्ह्यात कार्यरत होते.

त्यांनी राजस्थानच्या सूचना आणि जनसंपर्क, उद्योग आणि गुंतवणूक विभागात आपली सेवा दिली. ते 5 वर्ष इंडियन एअर लाइन्सचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक देखील होते.

तसे तर ते एप्रिल 2016 लाच निवृत्त झाले आहेत. मात्र त्यांची दूरदृष्टी आणि निवडणुकीच्या प्रकरणात त्यांची पकड यामुळे ते निवृत्तीनंतर देखील कार्यरत राहिले.

Leave a Comment