व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच येणार हे धमाकेदार फीचर

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचा कॉलिंग आणि मेसेजिंग अनुभव अधिक चांगला बनविण्यासाठी नवनवीन फीचर आणत असते. आता कंपनी लवकरच आयओएस बीटा व्हर्जनसाठी डिसअपेरिंग मेसेज फीचर (मेसेज आपोआप डिलिट होणारे फीचर) आणणार आहे. यामध्ये युजर्स टाइम सेटकरून मेसेज डिलीट करू शकतील. मात्र हे फीचर कधी रोल आउट होणार आहे याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

रिपोर्टनुसार,व्हॉट्सअ‍ॅप डिसअपेरिंग मेसेज फीचरचा वापर आयओएस बीटा व्हर्जन युजर्ससाठी करेल. याआधी हे फीचर अँड्राईड बीटा व्हर्जनसाठी सादर करण्यात आले होते. कंपनी मार्च-एप्रिलमध्ये सर्व युजर्ससाठी हे फीचर लाँच करण्याची शक्यता आहे.

या फीचर अंतर्गत पाठवण्यात आलेल्या मेसेजला डिलीट करण्यासाठी टाइम सेट करावा लागेल. निश्चित वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर सध्या टेस्टिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

ग्रुप अ‍ॅडमिनला देखील या फीचरचा सपोर्ट मिळेल. अ‍ॅडमिनला या फीचरचा वापर करण्यासाठी ऑन-ऑफ बटनसोबत 5 वेळेचे पर्याय मिळतील. यात एक तास, 1 दिवस, एक आठवडा, एक महिना आणि एक वर्ष असे पर्याय असतील. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप आपल्या सर्व युजर्ससाठी डार्कमोड हे फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे.

Leave a Comment