आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करतो. या डिव्हाईसमध्ये कागदपत्रे, फोटो आणि बँक खाते नंबर अशा अनेक महत्त्वपुर्ण गोष्टी असतात. मात्र अनेकदा स्मार्टफोन हॅक झाल्यामुळे ही माहिती चोरीला जाते. अनेकांना फोन हॅक झाला आहे याची माहिती देखील नसते. आज आम्ही तुम्हाला 5 अशी लक्षणे सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला समजेल की तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही ? अथवा कोणी हॅक करण्याचा प्रयत्न तर केला नाही ?

फोनची बॅटरी वेगाने कमी होणे –
जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी वेगाने कमी होत असेल, तर असे समजले जाऊ शकते की तुमच्या फोनमध्ये व्हायरस अथवा स्पाय अॅप इंस्टॉल झाला आहे.हे अॅप्स डिव्हाईसमधील रिसोर्सेजद्वारे डेटा सर्व्हरपर्यंत पोहचवतात. ज्यामुळे बॅटरीवर परिणाम होतो.

अज्ञात एसएमएस –
अनेकदा असे होते की, फोन हॅक झाल्यावर तुम्हाला अज्ञान नंबरवरून एसएमएस येतो. अथवा तुमच्या फोनवरून आपोआप मेसेज तुमच्या मित्रांच्या नंबरवर जातात. यापासून वाचायचे असेल तर चुकूनही अशा मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. हे मेसेज त्वरित डिलिट करा.

स्मार्टफोन गरम होणे –
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की तुमचा फोन अगदी कमी वेळ वापरल्यानंतर देखील गरम होतो. फोनच्या बॅकग्राउंडमध्ये व्हायरस असणारे अॅप्स चालत असल्याने फोन गरम होतो. हे अॅप्स सतत काम करत असतात आणि युजर्सचा डेटा सर्व्हरला पाठवतात.

स्मार्टफोनचा स्पीड –
व्हायरस अथवा मॅलिसिअस अॅपमुळे स्मार्टफोनचा स्पीड कमी होतो. या अॅप्समुळे डिव्हाईसच्या क्षमता आणि डेटावर परिणाम होतो. जर तुम्हाला डिव्हाईस हॅकिंगपासून वाचवायचा असेल तर वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा. यामुळे हॅकर्स तुमचा फोन हॅक करू शकणार नाही.