दरवर्षी प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षात जापानमध्ये ब्लूफिन ट्यूना माशाचा लिलाव करण्यात आला. हा मासा व्यापारी किओशी किमुराने 13 कोटी रुपयांमध्ये (193.2 मिलियन येन) खरेदी केला. या माशाचे वजन 276 किलोग्राम आहे.

एखाद्या ट्यूना माशासाठी लावण्यात आलेली ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी बोली आहे. किओशी यांनी मागील वर्षी 278 किलो ट्यूना माशासाठी 22 कोटी रुपयांची (333.6 मिलियन येन) बोली लावली होती. या माशांचा 1999 पासून लिलाव केला जात आहे. किओशी यांनी सांगितले की, ते या महागड्या माशाचे आपल्या हॉटेलमध्ये पदार्थ बनवून ग्राहकांना देतील.

ब्लूफिन ट्यूना मासा सहज मिळत नाही. हा लूप्त होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे या लिलावावर टीका देखील होते.