जगात एकूण 195 देश आहेत. यातील अनेक देश आकाराने खूप मोठे आहेत, तर काही खूपच छोटे आहेत. अशाच काही आकाराने लहान देशांबद्दल जाणून घेऊया. यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

माल्टा –
माल्टा भूमध्य सागरतील सात बेटांचा एक समूह आहे. याचे क्षेत्रफळ 316 वर्ग किमी आहे. या छोट्याशा देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे. या देशाला ऐतिहासिक महत्त्व असून, परदेशातून अनेक पर्यटक येथे येतात. 1962 ला हा देश स्वतंत्र झाला.

मालदीव –
मालदीव हा देखील जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे. हा जनसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील आशियातील सर्वात छोटा देश आहे. 298 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे. 1966 ला हा देश स्वतंत्र झाला.

सेंट किट्स आणि नेव्हिस –
कॅरेबिअन समुद्रात स्थित हा देश आहे. ही दोन सुंदर बेट आहेत, ज्यांचा शोध 1498 मध्ये कोलंबसने लावला होता. 1983 मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशाचे एकूण क्षेत्रफळ 261 वर्ग किलोमीटर आहे. ज्यात सेंट किट्स 168 आणि नेव्हिस 93 वर्ग किमी आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 50 हजार आहे.

मार्शल आयलंड –
मार्शल आयलंड हा 100 पेक्षा अधिक बेटांचा समूह आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 62 हजार आहे. या लहानशा देशाचा स्वतःचा ध्वज आणि संविधान आहे. मात्र येथील मुद्रा अमेरिकन डॉलर आहे.

लिचटेन्स्टीन –
केवळ 160 वर्ग किमीमध्ये पसरलेला लिचटेन्स्टीन हा देश ऑस्ट्रिया आणि स्विझर्लंडचे मध्ये आहे. येथील लोकसंख्या 40 हजार आहे. प्रती व्यक्ती जीडीपीच्या हिशोबाने हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे.

सॅन मॅरीनो –
या देशाची लोकसंख्या जवळपास 30 हजार असून, याचे क्षेत्रफळ 61 वर्ग किमी आहे. चारही बाजूंनी इटलीची सीमा असलेला हा देश युरोपचा सर्वात प्राचीन गणतंत्र देश आहे. याची स्थापना ईसवी सन 301 मध्ये झाली होती. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गाड्यांची संख्या लोकांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.

तुवालू –
हा देश 4 बेटांनी मिळून बनलेला आहे. प्रशांत महासागरामध्ये हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी आहे. 1978 मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाची लोकसंख्या 12 हजार आहे.

नॉरू –
केवळ 21 वर्ग किमीमध्ये पसरलेला हा देश जगातील सर्वात छोटे बेट असलेला देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 9 हजार आहे. येथे नारळाचे उत्पादन अधिक होते.

मोनॅको –
या देशाचे क्षेत्रफळ केवळ 2 वर्ग किमी आहे. हा जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे. येथील लोकसंख्या जवळपास 40 हजार आहे. हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. येथे कोट्याधीशांची संख्या अधिक आहे.

व्हॅटिकन सिटी –
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. केवळ 100 एकरमध्ये पसरलेला हा देश रोमने घेरलेला आहे. याला पवित्र देश देखील म्हटले जाते, कारण येथे जगातील सर्वात मोठे कॅथोलिक चर्च आहे. येथे 1.27 किमीची रेल्वे लाईन देखील आहे. जे जगातील सर्वात छोटे रेल्वे सिस्टम आहे.