व्हॉट्सअ‍ॅपवर आला New Year व्हायरसचा हल्ला!


नव्या वर्षामध्ये एका नव्या व्हायरसद्वारे लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर हल्ला केला जात असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर New Year व्हायरस नावाने एक नवा व्हायरस कार्यरत झाला असून स्मार्टफोन्सला याद्वारे लक्ष्य केले जात आहे.

युजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला जातो, एखाद्या वेबपेजची लिंक या मेसेजमध्ये दिली जाते. या लिंकवर क्लिक करण्यासाठी काही आकर्षक ऑफर्सद्वारे हॅकर्सकडून प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असतो. स्मार्टफोन किंवा संगणक मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करताच हॅक होण्याची शक्यता बळावते. याशिवाय अनेक जाहिरातींद्वारेही हे व्हायरसचे मेसेज पाठवले जातात. काही खोट्या सेवांना यामध्ये सबस्क्राइब करण्यास सांगितले जाते.

अशाप्रकारचे मेसेज एक धोकादायक स्कॅम असून अशाप्रकारचा मेसेज जर तुम्हाला देखील आला असेल तर त्यावर चुकूनही क्लिक करु नका. त्याचबरोबर मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करावे. कारण, त्या लिंकवर तुम्ही एकदा केले तर तुमची खासगी माहिती चोरी, बँक खात्याची माहिती इत्यादी अनेक बाबी चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला येणारा प्रत्येक मेसेज नीट वाचा, तो फेक मेसेज तर नाही आहे ना याची खात्री करा आणि नंतरच त्या लिंकला क्लिक करा.

Leave a Comment