स्मार्टफोन कंपनी लेनोव्हाने जगातील आतापर्यंतचा सर्वाल हलका लॅपटॉप लॅव्ही प्रो मोबाईल (Lavie Pro Mobile) लाँच केला आहे. या लॅपटॉपचे वजन केवळ 816 ग्रॅम आहे. या लॅपटॉपमध्ये युजर्सला 13 इंचचा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर मिळेल.
कंपनीच्या या लॅपटॉपची किंमत 1,599 डॉलर (जवळपास 1,15,253 रुपये) आहे. लेनोव्हाने या लॅपटॉपच्या भारतातील लाँचिंगबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. हा लॅपटॉप मार्च 2020 मध्ये अमेरिकेतील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Lavie Pro Mobile लॅपटॉपमध्ये कंपनीने 13.3 इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिजॉल्युशन 1920 x 1080 आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी यात इंटेल यूएचडी 620 जीपीयू सोबत 8 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज सपोर्ट मिळेल. लॅपटॉपच्या की-बोर्डबद्दल सांगायचे तर कंपनीने यात जापानी डिझाईन दिले आहे. या की-बोर्डमध्ये वेगवेगळे बटन असल्याने युजर्स जलद टायपिंग करू शकतील. याशिवाय युजर्सला यात टचपॅड देखील मिळेल.

कंपनीने या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी 3.1 टाइप सी, 2 पोर्ट, एचडीएमआय 1.4 आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉटसारखे फीचर्स दिले आहेत. युजर्सला यात 49 वॉटची बॅटरी मिळेल. कंपनीने दावा केला आहे की याची बॅटरी सतत 15 तास काम करेल.