झिरो डाउन पेमेंटमध्ये जावाची ही शानदार बाईक खेरदी करण्याची संधी

जावा मोटरसायकल्सने आपली बॉबर स्टाइल बाईक जावा पेराकची बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने ही बाईक नोव्हेंबर 2018 मध्ये सादर केली होती. आता कंपनीने या बाईकवर खास ऑफर आणली आहे. ग्राहक झिरो डाउन पेमेंटवर ही बाईक घरी घेऊन शकतात.

Image Credited – Amarujala

या बाईकची किंमत 1.94 लाख रुपये असून, Czech ब्रँड क्लासिक लिजेंड्सने (महिंद्रा ग्रुप) ही बाईक भारतात लाँच केली होती. कंपनीने या बाईकची बुकिंग सुरू केली असून, केवळ 10 हजार रुपयात ही बाईक घरी घेऊन जाता येईल. 2 एप्रिल 2020 पासून याची डिलिव्हरी होईल.

कंपनीने या बाईकवर खास ऑफर दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहक झिरो डाउन पेमेंटवर बाईक घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र बुकिंगसाठी 10 हजार रुपये भरावे लागतील, जे रिफंडेबल आहेत. झिरो डाउन पेमेंट ऑफरसह 6,666 रुपये ईएमआय ऑफरवर देखील बाईक घेता येईल. याशिवाय एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जुनी बाईक दिल्यावर 5 हजारांपर्यंतची सूट मिळेल.

Image Credited – Amarujala

जावा पेराकमध्ये ड्युअल चॅनेल एबीएससोबत मागील व पुढील व्हिल्समध्ये डिस्क ब्रेक मिळेल. पेराकमध्ये 334सीसी DOHC 4 वॉल्व लिक्विड कूल्ड बीएस6 इंजिन मिळेल. जे 30 बीएचपी पॉवर आणि 31 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड ट्रांसमिशन असेल व इंजिन प्रति लिटर 35 किमी मायलेज देईल.

या बाईकमध्ये कॅटीलिव्हर सीट, टेन लेदरमध्ये बॉबर स्टाइल सिंगल सीट, हँडल बारवर रिअर मिरर, नवीन स्विंगआर्म आणि राउंड आकाराचे हॅलोजन हेडलँम्प फीचर मिळेल.

Leave a Comment