खेळपट्टी सुकवण्यासाठी श्रीमंत बीसीसीआयचा ‘भयंकर’ प्रताप, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

भारत आणि श्रीलंकामधील 3 सामन्याच्या टी20 मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. टॉस जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामना सुरू होण्याच्या 10 मिनिटे अगोदर पावसाने हजेरी लावले.

पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू व्हावा यासाठी बीसीसीआयने खेळपट्टी सुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळपट्टी सुकवण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर केला त्याने बीसीसीआयची चांगलीच नाचक्की झाली.

बीसीसीआयने खेळपट्टी सुकवण्यासाठी वॅक्यूम क्लिनर, स्टीन आयरन आणि हेअर ड्रायर सारख्या उपकरणांचा वापर केला. खेळपट्टी सुकवण्यासाठी बीसीसीआयने केलेल्या या प्रतापामुळे सगळेच जण हैराण झाले.

सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी बीसीसीआयच्या या भन्नाट कल्पनेची खिल्ली उडवली.

नेटकऱ्यांनी बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्याची देखील आठवण करून दिली.

दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना हा 7 जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे.

Leave a Comment