दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले, ८ फेब्रुवारीला मतदान


नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आजपासूनच दिल्लीत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केला. आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

१४ जानेवारी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करता येणार आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

Leave a Comment