मुलाचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी वडिलांनी वापरली भन्नाट आयडिया

आज मोबाईलचे व्यसन एवढे लागले आहे की अनेकजण दिवसातील कितीतरी मोबाईलवरच घालवतात. गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे, मेसेज अशा गोष्टींवर तासंतास घालवतात. कॅनडाच्या जेमी क्लार्क यांनी आपल्या मुलाचे हेच मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढली.

मुलाची मोबाईलची सवय सुटावी यासाठी त्यांनी मंगोलिया बाईक ट्रिप करण्याचा विचार केला. जुलैमध्ये दोघेही मंगोलियासाठी निघाले. दोघांनी एका महिन्यात 2200 किमीचा प्रवास केला. या प्रवासामुळे दोघांचेही जीवन बदलले. खासकरून सतत मोबाईल वापरणाऱ्या त्यांच्या मुलामध्ये अनेक बदल झाले.

Image Credited- Navbharattimes

जेमी हे गिर्यारोहक आहेत. त्यांनी 2 वेळा एव्हरेस्ट शिखर सर केला आहे. त्यांनी आपला मुलगा Khobe ला अशा ठिकाणी नेले, जेथे इंटरनेट तर सोडाच, बस देखील येत नाही. एखाद्या गावात जाण्यासाठी घोड्यावर बसून जावे लागते.

क्होबेने सांगितले की, त्याने या प्रवासाआधी एकदिवस देखील विना फोनचा घालवला नव्हता. थोडा वेळ जरी स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम वापरले नाही तर राग येत असे. मात्र या प्रवासानंतर सर्व बदलले.

Image Credited- Navbharattimes

जेमी सांगतात की, मोबाईल फोन आज एक व्यसन झाले आहे. याने प्रत्येक व्यक्ती ग्रस्त आहे. फोन कुटुंबातील लोकांना वेगळे करत असेल, तर यामध्ये कुटुंबाचा देखील दोष आहे. त्यामुळे परिवारातील सदस्य म्हणून त्यांनी या ट्रिपचे आयोजन केले.

Image Credited- Navbharattimes

क्होबेने सांगितले की, या प्रवासानंतर त्याला समजले की त्याचा बहुतांश वेळ फोनवरच जात असे. त्याने आपल्या वडीलांना अजून जवळून ओळखले.

Leave a Comment