कोस्ट गार्डमध्ये 260 पदांसाठी नोकर भरती

भारतीय सागरी सुरक्षा दल अर्थात इंडियन कोस्ट गार्डने नाविक (जनरल ड्यूटी) पदांकरिता अर्ज मागवले आहेत. या जागेसाठी केवळ पुरूष उमेदवारच अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 26 जानेवारी 2020 ते 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांना परिक्षेसाठी ऐडमिट कार्ड 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत डाउनलोड करता येईल. परिक्षा ही फेब्रुवारी अथवा मार्च 2020 दरम्यान पार पडेल.

पदे – 

एकूण 260 जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये जनरल 113 पदे, ईडब्ल्यूएस 26, ओबीसी 75, एससी 33 आणि एसटी 13 पदे आहेत.

वयाची अट –

उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 मधील असणे गरजेचे आहे. जनरल गटातील उमेदवारांसाठी किमान वय 18 आणि कमाल वय 22 वर्ष असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी 27 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी वयाची कमाल मर्यादा 25 वर्ष आहे.

शैक्षणिक योग्यता –

केंद्र अथवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त बोर्डातून गणित आणि भौतिकशास्त्रात कमीत कमी 50 टक्क्यांसह 12वी पास असणे आवश्यक आहे. आरक्षित आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना गुणात 5 टक्क्यांची सवलत मिळेल.

इच्छुक उमेदवार अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी www.joinindiancoastguard.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Leave a Comment