जेएनयुतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे झाली मुंबई हल्ल्याची आठवण – मुख्यमंत्री


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे २६/११ ची आठवण झाल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातील युवकांच्या मनात अस्थिरता असून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. जेएनयूत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारला हा टोला लगावला आहे. युवकांना आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुसरुन विश्वासात घ्यायला हवे. त्यांच्या वसतीगृहात युवक हे होणार असतील तर ते गंभीर आहे. असले प्रकार महाराष्ट्रात अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात असा विश्वास त्यांनी युवकांना दिला आहे.

बुरखे घालून हल्ले भित्रे होते म्हणूनच केले अशी टीका त्यांनी हल्लेखोरांवर केले. जे आरोपी आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी असे ठाकरे म्हणाले. देशातील वातावरणामुळे विरोध होणारच असा टोला देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. पोलिसांची जेएनयू हल्ला प्रकरणात भूमिका देखील संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. देशभरातील तरुणांकडून जेएनयू हल्ला प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. या विद्यार्थ्यांसोबत मी पूर्णपणे आहे. महाराष्ट्रात कोणीही काळजी करु नका असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Leave a Comment