जेएनयू हिंसाचार प्रकरणी आनंद महिंद्रांची संतप्त प्रतिक्रिया


नवी दिल्ली – अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर चेहरे झाकलेल्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या, तर अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे, पण हे सर्व आरोप अभाविपने फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


या घटनेवर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. आपले राजकारण काय आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही. आपली विचारधारा काय आहे याने काही फरक पडत नसून आपण जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेऊ नये. ज्यांनी जेएनयूत हल्ला केला त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.

Leave a Comment